भारत कोरोनामुक्त होवो; अमित शहा यांची दगडूशेठ चरणी प्रार्थना

Amit shah
Amit shahANI
Updated on

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील (Maharashtra) दौरा आहे. सध्या भाजपचे नेते राज्यातील सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत असताना केंद्रीय सहकार मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अमित शहा पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. पुणे महानगरपालिका निववडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यालाही ते उपस्थिती लावणार आहेत.

आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो आणि महाराष्ट्रासह भारत देश कोरोनामुक्त होवो, असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

अमित शाहांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी 10 वाजता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने होणार आहे. CFSL कॅम्पसमध्ये ते नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. यानंतर सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koregaon Park Water Supply
Sinhagad Road Traffic
The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
Marathi News Esakal
www.esakal.com