Amit Thackrey in Pune: लोकसभेच्या तोंडावर अमित ठाकरे का उतरले पुण्याच्या रस्त्यांवर?

Amit Thackrey Morcha: राज ठाकरे दौरे, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, तर अमित ठाकरे विद्यार्थी आणि तरूणांसाठी पुण्याच्या रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात धडक मोर्चा काढला आहे.
Amit Thackrey in Pune
Amit Thackrey in PuneEsakal

Amit Thackrey in Pune: आगामी निवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखायला सुरवात केली आहे. अशातच इतर पक्षांप्रमाणे मनसेने देखील आपल्या हालचाली सुरू केल्या आहे. राज ठाकरे दौरे, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, तर अमित ठाकरे विद्यार्थी आणि तरूणांसाठी पुण्याच्या रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात धडक मोर्चा काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज शुक्रवारी (ता. २३) पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पुणे शहरात संघटना बांधणी करत आहेत. आता मनसे युवकांना लक्ष करुन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.

विद्यापीठात नवीन वसतीगृह बांधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत, विद्यापीठात विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला आहे.

Amit Thackrey in Pune
Manohar Joshi Passed Away: सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री...मनोहर जोशी यांची कारकीर्द

येत्या काळात प्रत्येक विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक मनविसे लढवणार असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सर्वाधिक प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी हितासाठी असणाऱ्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाला ठराविक दिवसांचा अवधी दिला जाईल. त्या कालावधीत विद्यापीठाने मागण्यांची योग्यप्रकारे पुर्तता करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

Amit Thackrey in Pune
Manohar Joshi: 'मी मुख्यमंत्री पण वाहन महापौरांचं..', मनोहर जोशींनी का वापरली फडणवीसांची गाडी? सांगितला भावूक किस्सा

मागण्या काय?

शिक्षणासाठी परदेशात किंवा परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत.

विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा ऑनलाईन करा!

वसतिगृहांची दुर्दशा आणि मेसमधील निकृष्ट जेवण यांमुळे विद्यार्थी संतप्त आहेत.

वसतिगृहांचा सर्वांगीण दर्जा सुधारा.

विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व द्या!

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरी- रोजगाराची कोणतीही शाश्वती नाही.

विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे. रोजगार मेळावे घ्यावेत.

हाणामारी, छेडछाड, ड्रग्जचे सेवन यांमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशांतता आहे.

शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवा !

दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा.

नाशिक आणि नगर उपकेंद्रामध्येच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हायला हवीत ...

नवीन वसतिगृहे बांधण्याचे काम तत्काळ सुरू व्हायलाच हवे !

मराठी भाषा भवन झालेच पाहिजे ... !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com