अमोल कोल्हे यांनी मारला सुप्रिया सुळे यांना टोमणा... 

supriya sule- amol kolhe
supriya sule- amol kolhe

पुणे : ""लॉकडाउनला सुरवातीला आपल्याकडे गमतीने घेतले गेले. मी अमुक करेल, मी तमुक करेल, असे वेगवेगळे प्लॅन अनेकांनी आखले. अनेकांनी; तर आपला वजन कमी करण्याचा प्लॅनही तयार केला असे,'' असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी, "हा मला टोमणा आहे का?' असे विचारले. त्यावर दोघेही हसू लागले. 

इन्स्ट्राग्राम लाईव्हद्वारे खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी एकमेकांशी संवाद साधला. त्यावेळी दोघांनीही लॉकडाउनमधील अनेक किस्से सांगितले. तसेच, कोरोनाशी लढा देताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी चर्चा केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

Reply Forward  

या वेळी सुरवातीलाच सुप्रिया सुळे म्हणाले, ""बरोबर दोन महिन्यांपूर्वी डॉ. कोल्हे आणि मी दिल्लीवरून मुंबईला परतलो. त्यावेळी आता दोन महिने पुन्हा आपल्याला दिल्लीला जाता येणार नाही, असं क्षणभरही वाटलं नव्हतं. लॉकडाउनचे हे दोन महिने किती लवकर गेले, हे समजलेही नाही.'' 

""लॉकडाउनच्या 57 दिवसांमध्ये आपण काय काय प्लॅन केलं आणि त्यातील किती अमलात आणलं, याचा प्रत्येकाने विचार केला; तर प्रत्येकाकडे त्याचे गमतीशीर उत्तर असेल. प्रत्येकाने या लॉकडाउनच्या कालावधीकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास प्रत्येकाची एक स्टोरी तयार होईल,'' असे डॉ. कोल्हे यावेळी म्हणाले. 

अमोल कोल्हे यांना मुलाकडून प्रेरणा              ""दोन महिने घरात राहणे, ही लहान मुलांसाठी खूप अवघड गोष्ट आहे. माझी मुले मोठी आहेत, पण तुमची मुले लहान आहेत, त्यांचा कसा अनुभव होता?'' अशी विचारणा सुळे यांनी डॉ. कोल्हे यांना केली. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ""या लॉकडाउनमध्ये लहान मुलांकडून खूप शिकायला मिळाले. मी 560 स्केअर फुटाच्या वनबीएचके फ्लॅटमध्ये राहतो. या लॉकडाउनमध्ये माझा मुलगा कसलीही तक्रार न करता न कंटाळता खूष राहतो. चार वर्षांचा मुलगा या परिस्थितीत खूष राहू शकतो; तर आपण का राहू शकत नाही.?'' 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com