

अमरावती बाजारात फळांच्या राजाची गर्दी
विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे, भाजीपाला आणि हंगामी आंब्याची आवक वाढत आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागांतून विविध जातींच्या आंब्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशातील हापूस आंब्याचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशातील हापूस आंब्याला सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळत असून, त्याची आवक ११३ क्विंटल झाली.
अमरावती फळ व भाजी बाजारात स्थानिक चरकूल आंब्याची १२८ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. या आंब्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ३८०० रुपये दर मिळाला. त्यापाठोपाठ केशर आंब्याची १३२ क्विंटल आवक झाली असून, त्याला ४ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला. बैंगणपल्ली आंब्याची २३७ क्विंटल आवक झाली असून, त्याचे व्यवहार २५०० ते ३५०० रुपयांनी झाले. लालपट्टा आंब्याला प्रतिक्विंटल २६०० ते ३२०० रुपये दर मिळाला असून, त्याची ११५ क्विंटल आवक झाली. तोतापुरी आंब्याची ११२ क्विंटल आवक झाली असून, त्याला १५०० ते २ हजार रुपये दर मिळाला. कैरीला प्रतिक्विंटल १६०० ते २२०० रुपये दर मिळत असून, तिची आवक मागील आठवड्यातील १०० क्विंटलवरून या आठवड्यात ७३ क्विंटलपर्यंत घटली.
बाजारात लिंबाची आवक घटून केवळ ४२ क्विंटलवर आली आहे. सध्या लिंबाला प्रतिक्विंटल ५५०० ते ६ हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. नव्या हंगामातील भुईमूग शेंगाची ७० क्विंटल आवक झाली असून, तिला ४ हजार ते ४५०० रुपये दर मिळत आहे. पपईची ७६ क्विंटल आवक झाली असून, तिला १६०० ते २२०० रुपये दर मिळाला. कलिंगडाची आवक नियमित असून, ती १२४ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. सध्या कलिंगडाला ७०० ते १४०० रुपये दर मिळत आहे. खरबूजाची १२९ क्विंटल आवक झाली असून, त्याला १२०० ते १६०० रुपये दर मिळाला.
चौकट
भाजीपाल्याची आवकही वाढली
भाजी बाजारात सध्या बटाट्याची सर्वाधिक ५१० क्विंटल आवक होत आहे. उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बटाट्याला प्रतिक्विंटल ४०० ते १५०० रुपये दर मिळत आहे. कांद्याची ३८० क्विंटल आवक झाली असून, त्याला ४०० ते १७०० रुपये दर मिळाला.लसणाचीही चांगली आवक नोंदविण्यात आली. आल्याची ७२ क्विंटल आवक झाली असून, त्याला २५०० ते ५५०० रुपये दर मिळाला. वांग्याची ८३ क्विंटल आवक झाली असून, त्याला १५०० ते २ हजार रुपये दर मिळाला. ढेमसाची ७९ क्विंटल आवक झाली असून, त्याला २५०० ते ३ हजार रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची ८५ क्विंटल आवक झाली असून, तिचे व्यवहार २५०० ते ३ हजार रुपयांनी झाले. भेंडीची ७३ क्विंटल आवक झाली असून, तिला २६०० ते ३२०० रुपये दर मिळाला. मेथीची ५७ क्विंटल आवक झाली असून, तिला २५०० ते ३ हजार रुपये दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.