

EWS research scholars have expressed concern over the delay in AMRUT’s PhD fellowship advertisement, while other state research institutes have already begun the application process.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : राज्यातील स्वायत्त संस्थांच्या सर्वंकष धोरणानुसार ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘आर्टी’ आणि ‘टीआरटीआय’ या संस्थांनी पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) कार्यरत असलेल्या ‘अमृत’ संस्थेला अद्याप जाहिरात काढण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. संस्थेच्या या लालफीतशाहीमुळे ‘ईडब्ल्यूएस’ घटकातील संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, प्रशासनाच्या या अनास्थेवर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.