बारामती तालुका दूध संघाच्या संचालकपदी अमृता गारडे

बारामती तालुका दूध संघाच्या संचालकपदी अमृता गारडे

Published on

मोरगाव, ता. २४ : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकपदी बारामती तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती अमृता योगेश गारडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक, सहकारी दूध उत्पादक संस्था विभाग, पुणे येथील राजकुमार पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष संजय कोकरे, उपाध्यक्ष दत्तात्रेय वावगे, बारामती दूध संघाचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक संभाजी होळकर तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल उपस्थित होते.
गारडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध संस्थांवर यापूर्वी सक्रियपणे काम केले आहे. बारामतीच्या जिरायती भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न दूध संघाच्या माध्यमातून सोडविणे, दूध उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, बारामती दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यामधील सकारात्मक दुवा म्हणून काम करणे यावर भर देणार असल्याचे निवडीनंतर गारडे यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबाचीही सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम पार्श्वभूमी आहे. त्यांच्या सासूबाई कै. रुक्मिणी पांडुरंग गारडे या देखील बारामती पंचायत समितीच्या सदस्य होत्या, तर त्यांचे सासरे पांडुरंग रामचंद्र गारडे यांनी तब्बल १३ वर्षे मोरगावचे सरपंच म्हणून कार्य केले आहे. दरम्यान, अमृता गारडे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com