शिवथरच्या अमृता साबळेची उपजिल्हाधिकारीपदी निवड 

पांडूरंग बर्गे
गुरुवार, 31 मे 2018

कोरेगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा बुधवारी (ता. 30) रात्रि उशीरा निकाल जाहिर झाला. त्यात शिवथर (ता. सातारा) येथील अमृता विलासराव साबळे ही युवती खुल्या महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिची "उपजिल्हाधिकारी"पदी निवड झाली आहे.

"उपजिल्हाधिकारी" पदाच्या खुल्या महिला प्रवर्गात दोन जागा होत्या. त्यातील एक जागा अमृता हिने पटकावली आहे. "विक्रीकर अधिकारी" पदाच्या परिक्षेतही अमृताने राज्यात महिला प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला होता. कोरेगाव पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विलासराव साबळे यांची अमृता ही कन्या आहे.

Web Title: amruta sable is now a deputy collector's