लॉकडाऊनमुळे पुण्यात पाळणा व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

amusement-park
amusement-park

खळद - संपूर्ण देशावरती कोरोनाचे महाभयंकर संकट कोसळले असताना अनेक लहान-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत,अशा परिस्थितीत गावोगावी यात्रा-जत्रांमध्ये फिरून रोजीरोटी चालवणारे पाळणा व्यवसायिकदार आपला व्यवसाय बंद असल्याने हवालदिल झाले असून त्यांच्यासमोर उपासमारीचे मोठे संकट कोसळले असल्याचे पाहावयास मिळत आहे.‌

पुणे येथे ते सारसबाग परिसरात तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाळणा व्यवसाय करणारे निवृत्ती लक्ष्मण जाधव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आम्ही गेले पाच महिन्यापासून शिवरी (ता. पुरंदर)या ठिकाणी अडकून पडलो आहे. आमचे सर्व साहित्य ही या ठिकाणी असून ते ठेवण्यासाठीही आम्हाला जागा मालकाला भाडे मोजावे लागत आहे. सध्या कोरोनामुळे अनेक गावच्या यात्रा- जत्रा रद्द झाल्या यामुळे आम्हाला आमच्या व्यवसायासाठी कुठेही जाता आले नाही, हा आमचा दोन पिढ्यांचा परंपरागत व्यवसाय आहे, आम्ही जवळपास पन्नास लाख रुपये भांडवल गुंतवणूक करून साहित्यांची उभारणी केली आहे. यामध्ये जवळपास २० ते २५ मजूर काम करतात, परराज्यातील मजुर लॉकडाऊन पडल्यानंतर काही कालावधीमध्ये निघून गेले. मात्र, स्थानिक दहा ते पंधरा मजूर अद्यापही बरोबरच असून त्यांचा सर्व खर्च आम्हाला करावा लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर आमच्या पाळणा व्यवसायिकदारांची कोणतीही संघटना नसल्याने आम्हाला एकत्रित होऊन शासनदरबारी आमची कैफियत मांडता येत नाही. अशा परिस्थितीत शासनाने आमचा व्यवसायाचा व आमच्या उदरनिर्वाहाचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. याबाबत आम्हाला एक तर अनुदान द्यावे नाहीतर ज्या ज्या ठिकाणी ग्रीन झोन झालेले आहेत अशा परिसरात आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानग द्यावी. या माध्यमातून आम्हाला चार रुपये नफा मिळाला नाही तरी चालेल मात्र आज रोजी आम्हाला दोन वेळचे अन्न मिळवणे ही अवघड झाले आहे, यातून किमान आमचा रोजीरोटीचा प्रश्‍न जरी मार्गाला लागला तरी खूप मोठी मदत होईल, अशी भावना जाधव यांनी बोलून दाखविली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com