रामवाडी : ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्त

नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना सोसायटीच्या रहिवाशांचा घेराव
आनंद पार्क सोसायटीतील रहिवाशां कडून प्रशासन अधिकारी घातला घेराव
आनंद पार्क सोसायटीतील रहिवाशां कडून प्रशासन अधिकारी घातला घेरावsakal

रामवाडी : वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीच्या समोर कित्येक महिन्या पासुन ड्रेनेज पाणी साठून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे आगार हे ठिकाण बनले आहे. तळमजल्यावरील सदनिकेत मैलायुक्त पाणी आत येत आहे जावे कुठे हा प्रश्न सोसायटी तील रहिवाशांना पडतो. या आशयाची बातमी सकाळ मध्ये (ता.16 ) प्रसिद्धी करण्यात आल्या नंतर प्रशासनाला खडबडून जागा आली आहे. सोसायटीमध्ये पाहणी साठी आलेल्या नगररोड क्षेत्रीय कार्यालया च्या सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांना रहिवाशांनी घेराव घातला. ड्रेनेजची समस्या न सोडवल्या आम्ही पालिका आयुक्तां च्या ऑफिस बाहेर उपोषण करू असे निक्षून रहिवाशांकडून या प्रसंगी सांगण्यात आले.

आनंद पार्क सोसायटीत 132 सदनिका आहे. बाजुला महानगरपालिकेचे अण्णा हजारे उद्यान आहे. पावसाचे पाणी आणि ड्रेनेज पाणी या ठिकाणी येऊन साचते.जोराचा पाऊस झाल्यावर हेच घाण पाणी तळ मजल्यावरील 12 सदनिकेत घुसते दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. अण्णा हजारे उद्यानाच्या प्रवेश द्वारा बाहेर साचलेल्या घाण दुर्गंध युक्त सांडपाण्यातुन आत जावे लागत आहे. उद्यानाच्या उजव्या बाजूला 5 फुट खड्डा खोदण्यात आला आहे. कित्येक दिवसापासुन पथदिवे बंद आहेत. उद्यानात जाण्यासाठी मुलांना स्वतः चा जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी जावे लागत आहे.लवकरात लवकर ड्रेनेज कामे पुर्ण करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

आनंद पार्क सोसायटीतील रहिवाशां कडून प्रशासन अधिकारी घातला घेराव
या दिवाळीत झटपट पर्सनल लोन घेऊन तुमचे आर्थिक स्वातंत्र्य बळकट करा

कित्येक वर्षापासुन या समस्याने त्रस्त झालो आहोत. प्रशासनाने दहा दिवसात ड्रेनेज कामे पुर्ण केले नाही तर आम्ही रहिवासी पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या ऑफिस बाहेर उपोषण करणार आहे. तसेच नगररोड रस्तावर आंदोलन करणार आहे.

सुनील चूत्तर -सोसायटी अध्यक्ष

ड्रेनेज कामे करताना काही तांत्रिक अडचणी येत आहे. ज्या ठिकाणी अडवणूक होत आहे त्या खासगी जागा मालकांशी बोलणे सुरू आहे. दिवाळी पूर्व कामे पुर्ण होतील.

योगेश मुळीक - नगरसेवक

आनंद पार्क सोसायटीतील ड्रेनेजची कामे ही दहा दिवसाच्या आत पूर्ण केले जातील असे आश्वासन सोसायटीतील रहिवाशांना त्यांच्या कडून देण्यात आले .

सुहास जगताप : सहाय्यक आयुक्त नगररोड क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com