Pune News : ‘ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ने अनंत अंबानी यांचा सन्मान
‘वनतारा’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राण्यांचे जीव वाचविणे, उपचार, पुनर्वसन आणि संरक्षण यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत अनंत अंबानी यांना सन्मान देण्यात आला.
पुणे - वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनंत अंबानी यांना ‘ग्लोबल ह्यूमन सोसायटी’तर्फे ‘ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ने अमेरिकेत आंतरराष्ट्रीय समारंभात सन्मानित करण्यात आले.