माले - मुळशी तालुक्याच्या पश्चिम पटटयातील पिंपरी (ता. मुळशी) येथील सुधागड अभयारण्यातील अंधारबन नेचर ट्रेल व कुंडलिका व्हॅली येथे पर्यटकांची होणारी अनियंत्रीत गर्दी, अभयारण्य क्षेत्रातील पर्यटकांच्या प्रवेशामुळे वन्यप्राणी तसेच वन्यजीव अधिवासाला हानी होत असल्याने दोनही पर्यटन ठिकाणे सुरक्षिततेच्या कारणास्तव गुरुवार (ता. ३) पासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली आहेत. विना परवाना प्रवेश करणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.