Water Scarcity : आणे गावाचा पाणीपुरवठा दीड महिन्यापासून बंद! ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल; रास्ता रोकोचा इशारा देताच टँकरची व्यवस्था

आणे (ता. जुन्नर) गावाला पाणीपुरवठा करणारी बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Water Scarcity

Water Scarcity

ESakal

Updated on: 

- राजेश कणसे

आळेफाटा - आणे (ता. जुन्नर) गावाला पाणीपुरवठा करणारी बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी (दि. २९) गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे तूर्तास प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com