आनेवाडी फाट्यावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रवाशी व पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत, प्रशासनाचे दुर्लक्ष

आनेवाडी फाट्यावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रवाशी व पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत, प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on

आनेवाडी फाट्यावर वाहतुकीचा विस्कळितपणा

नागरिकांचे जीव धोक्यात; बाजारपेठ व टोलनाक्यामुळे तासन् तास कोंडी

आनेवाडी, ता. ७ : जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनेवाडी फाट्यावर सध्या वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, दररोज हजारो प्रवासी आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच वारंवार वाहतूक वळवण्याच्या निर्णयामुळे या ठिकाणी सतत कोंडी होत असून, स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील या फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यात आला असला, तरी पुलावर नेहमीच दुरुस्ती किंवा इतर कामे सुरू असल्याने वाहतूक वारंवार मुख्य मार्गावरून सेवा मार्गावर वळवली जाते. त्यामुळे सर्व प्रकारची वाहने आनेवाडी फाट्यावर एकत्र येतात. परिणामी या ठिकाणी सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग यांना याचा मोठा फटका बसत आहे.
आनेवाडी फाटा हा परिसरातील बाजारपेठेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. सुमारे २५ गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी, तसेच दैनंदिन कामांसाठी येथे येत असतात. सेवा मार्गावरून वाहतूक वळवल्यानंतर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघाताची भीती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. याशिवाय फाट्यालगत असलेल्या टोलनाक्यामुळे वाहनांची गर्दी आणखी वाढते. टोल भरण्यासाठी रांगा लागल्याने वाहने फाट्यापर्यंत थांबतात आणि त्यामुळे कोंडी अधिकच वाढते. गावातून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे काहीवेळा किरकोळ वादावादीचे प्रकारही घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, या मार्गावर कामे सुरू करताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहतूक वळवली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे दुचाकी चालक, प्रवासी तसेच फाट्यावरील व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ते विकास विभागाने तातडीने योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.


02422
आनेवाडी : फाट्यावर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी. (प्रशांत गुजर ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com