MP Dr. Amol Kolhe
sakal
नारायणगाव - अंगणवाडीच्या मुलांना शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहारासाठी दिले जाणारे पांढरे वटाणे, भरडा व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत असून हा आहार खाण्यास बालके नकार देत आहेत. या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी करावी. असे आवाहन सोशल मीडियाच्या मार्फत करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.