Pune News : सासवड नगरपालीकेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम सुरु

सातारच्या संस्थेचे प्रशिक्षीत पथक नेमले., मोकाट कुत्र्यांचे रेबीज लसीकरणही होतेय
Animal protection rabies vaccination campaign of street dogs started through Saswad Municipality pune
Animal protection rabies vaccination campaign of street dogs started through Saswad Municipality pune sakal

सासवड : सासवड नगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या अलीकडील काळात प्रचंड वाढली. त्यातून नागरीकांना व दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मोकाट कुत्र्यांच्या चाव्याने कितीतरी लोकांना उपचार करावे लागत असतात.

एकुणच नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने नगरपालिका उपाययोजनेच्या प्रयत्नात होती. अखेर सातार येथील एका संस्थेचे प्रशिक्षीत पथक पालिकेस उपलब्ध झाले. या आठवड्यात ही भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम सुरु झाली. मोहिमेत एकदा कुत्रे पकडले की, निर्बीजीकरणसोबतच मोकाट कुत्र्यांचे रेबीज लसीकरणही होत आहे., हे वैशिष्ट्य आहे.

सासवड (ता.पुरंदर) येथे जुने गावठाण, सोपाननगर भाग व विविध रस्त्यांच्या दुतर्फा लोकवस्ती वाढली. त्याच पध्दतीने भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली. राज्य महामार्गामुळे येथे विविध खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने, हाॅटेल, फिरते विक्रेते वाढले.

त्यातूनही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. त्यांना नष्ट करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर त्यांची संख्या सतत वाढती राहीली. दिवसाही या कुत्र्यांचा नागरीकांना त्रास असतोच. त्याशिवाय रात्री दहा ते बारानंतर गल्ली - गल्लीतून, चौका चौकात आणि रस्त्यावर ही कुत्री फिरतात. अनेकदा गुरखा, भिक्षेकरी, लोककलावंत यांच्यावर ती धावून जातात.

सामान्य माणसांनाही व विशेष अबाल - वृद्धांना ती चावल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. त्यांची शिकार ठरतात. त्यामुळे सरकारने 2001 ला जो कायदा केला, त्यानुसार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करता येते. त्यातूनच सासवडला ही भटक्या कुत्र्यांसाठी मोहीम पालिकेने उघडली. या मोहिमेसाठी कोणत्याही नगरपालिका स्वतःच निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे.

एकट्या सासवड नगरपालीका हद्दीत भटक्या भटक्या वा मोकाट श्वानांची अंदाजे संख्या आठशेपेक्षा जास्त असण्याचा पालिका यंत्रणेचा अंदाज आहे. प्रत्यक्षात ही संख्या एक हजारच्या पुढे जाऊ शकते. मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले की., सातारा येथील व्हेटस फाॅर अॅनिमल या संस्थेच्या माध्यमातून या सप्ताहापासून ही मोहिम हाती घेऊन निर्बीजीकरण व रेबिज लसीकरण केले जात आहे.

यासाठीच्या पथकमध्ये प्रशिक्षित दहा कामगारांचा समावेश आहे. शिवाय दोन प्रशिक्षित पशु वैद्यकीय डाॅक्टर आहेत. पथकाने जाळीने भटके कुत्रे पकडले की, डाॅक्टरांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केल्यावर त्याच्या शरीरावर विशिष्ट खूण केली जाते. या प्रक्रियेनंतर तीन दिवस कुत्र्याला संभाळून उपचार करुन मग त्या भटक्या कुत्र्यांना त्यांच्या मुळ जागेवर सोडले जाते.

``सासवड नगरपालिकेमार्फत पथक नियुक्त करुन भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरणाची व रेबीज लसीकरण मोहिम सुरु आहे. दिवसाला 20 ते 25 भटकी वा मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर प्रशिक्षित पशु वैद्यकीय डाॅक्टरांकडून नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर उपचार करुन त्या कुत्र्यांना पुन्हा मुळ जागेवर सोडण्यात येते. एका कुत्र्यासाठी २,२०० रुपये खर्च येतो. मोहीमेत आतापर्यंत 140 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून त्यांचे रेबिज प्रतिबंधक लसीकरणही केले आहे. हे काम पुढे आणखी किमान 15 दिवस तरी सुरु राहील. प्राणीप्रेमी संघटना व नागरिकांनी या मोहीमेस सहकार्य करावे.``

- निखील मोरे, मुख्याधिकारी ः सासवड नगरपालिका

``सासवड शहरात मोकाट व भटकी कुत्री मोठ्या संख्येने वाढली होती. पुणे महापालिकेस याबाबत श्वान पकडण्याचा वाहनातील पिंजरा सासवड नगरपालिकेने अनेकदा मागितला होता. पण तो मिळत नव्हता. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने प्रशिक्षीत पथक नियुक्त करुन भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरणाची व रेबीज लसीकरण मोहिम सुरु केली. त्याबद्दल प्रशासन व यंत्रणेला मी लोकप्रतिनीधी म्हणून धन्यवाद देतो.``

- संजय जगताप, आमदार पुरंदर-हवेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com