
पुणे : अपघातामुळे पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन मणका मोडलेल्या मांजरीवर यशस्वी उपचार झाले. तब्बल सहा महिन्यानंतर कोणत्याही वेदनेशिवाय ती पुन्हा चालू लागली. राधिका दीक्षित यांना जानेवारीमध्ये रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत मांजर आढळली. तिने तिची चालण्याची क्षमता गमावली होती. राधिका यांनी त्या मांजरीला उपचारासाठी बाणेर रस्त्यावरील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथे प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल केले.