पंढरपूर येथे आज अंजली गायकवाडची ''शिवशंभो'' भजनसंध्या

पंढरपूर येथे आज अंजली गायकवाडची ''शिवशंभो'' भजनसंध्या

Published on

KRK26B03781
अंजली गायकवाड
........
पंढरपुरात आज ‘शिवशंभो’ भजनसंध्या
........
करकंब : महाशिवरात्रीनिमित्त बेलीचा महादेव सेवा परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे (उद्या रविवारी) सायंकाळी सहा वाजता इंडियन आयडॉल विजेती गायिका अंजली गायकवाड हिचा ‘शिवशंभो’ भजनसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रदक्षिणा रोडवरील बेलीचा महादेव मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी साथसंगत अंगद गायकवाड (हार्मोनियम), सोहम गोराणे (तबला), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज), माऊली पिसे (टाळ) यांची लाभणार आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून तीन दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत आरोग्य सेवा शिबिर व रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. रात्री नऊ वाजता शंभू महादेवाची महाआरती संपन्न होणार आहे. तर सोमवारी (ता.१६) रोजी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद दिला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेलीचा महादेव सेवा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com