

Anju Shende Assumes Charge as Pune District and Sessions Court Chief Judge After Long Experience in Judicial Service
esakal
पुणे: पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश म्हणून अंजू एस. शेंडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. न्यायाधीश शेंडे यांनी अमरावती येथे केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायालय, मुंबई येथे महिलांवरील अत्याचार निवारण न्यायालय, पोक्सो न्यायालय आणि 'सेबी'च्या विशेष न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे.