अनकढाळ टोल नाक्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न गंभीर:-

अनकढाळ टोल नाक्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न गंभीर:-
Published on

SGL26B01278
अनकढाळ (ता. सांगोला) ः स्वच्छतागृहाच्या परिसरात साचलेला कचरा.

अनकढाळ टोलनाक्यावरील स्वच्छतागृहाची दुरवस्था
सांडपाणी मोकळ्यावर; प्रवासी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
वाटंबरे, ता. १० ः सांगोला तालुक्यातील सांगली-सोलापूर महामार्गावरील अनकढाळ टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाची टाकी पूर्ण भरल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत साचले आहे. परिसरात कचरा पडलेला असून, स्वच्छतागृहाच्या आतही अस्वच्छता आहे. टोल नाक्याच्या वरील आणि खालील दोन्ही स्वच्छतागृहांची अशीच अवस्था असल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक, परिसरातील व्यावसायिक आणि टोल कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई तसेच सांडपाण्याचे व्यवस्थापन होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोकळ्या जागेत साचलेल्या सांडपाण्यामुळे डास वाढण्याची तसेच संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील या टोल नाक्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित टोल प्रशासनाने तातडीने सांडपाणी व कचरा साफ करून स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com