
अंकिता पाटील ठाकरे यांनी 'फोर्ब्स'मध्ये स्थान मिळविलेल्या आर्या तावरेचे केले अभिनंदन
इंदापूर : जगभरात नावजलेल्या "फोर्ब्स" मासिकांमध्ये युरोपातील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षाखालील ३० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कु. आर्या कल्याण तावरे यांनी स्थान मिळवून युवा पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे जग भरात भारत व महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. या अनमोल कार्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्यासहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत आर्या चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिता पाटील ठाकरे व आर्या तावरे यांचीकाही दिवसांपूर्वी पुणे येथे भेट झाली होती. सदर भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अंकिता पाटील ठाकरे यांनी आर्या तावरे यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या,कु. आर्या तावरे यांनी अवघ्या २०-२१ व्या वर्षी फ्यूचरब्रीक्स स्टार्टअप सुरु करून स्वतःची एक ओळख निर्माण केली.
लंडन मध्ये छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठाकरणारा हा स्टार्टअप असून फ्यूचरब्रीक्स या स्टार्टअपचे आजचे बाजारमुल्य ३२.७ कोटी पौंड असून फ्यूचरब्रीक्स २२ वेगवेगवेळ्या बांधकामप्रकल्पावर काम करीत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक करण ग्रुप प्रोमोटर्स अँड बिल्डरस चे संस्थापक कल्याण तावरे यांच्या त्या कन्या आहेत. युवक युवतींनी त्यांच्या प्रमाणे स्टार्ट अप सुरू करून उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही अंकिता पाटील ठाकरे यांनी शेवटी दिली.
Web Title: Ankita Patil Thackeray Congratulates Arya Taware For Getting Place In Forbes Indapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..