झेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा गुरुवारी (ता. २२) सर्वसाधारण सभेत होणार आहे. अंकिता या स्थायी समितीच्या सर्वांत तरुण सदस्य बनणार आहेत.

पुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा गुरुवारी (ता. २२) सर्वसाधारण सभेत होणार आहे. अंकिता या स्थायी समितीच्या सर्वांत तरुण सदस्य बनणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेत सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या रत्नप्रभादेवी पाटील या स्थायी समितीच्या सदस्य होत्या. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील या निवडून आल्या आहेत.

जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता, अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण अशा एकूण दहा विषय समित्या आहेत. या सर्व समित्यांमध्ये स्थायी समिती ही सर्वांत महत्त्वाची समिती आहे. सध्या सर्व विषय समित्यांमध्ये मिळून केवळ स्थायी समितीचेच एक सदस्यपद रिक्त आहे. शिवाय, या दहापैकी कोणत्याही समितीचे सदस्य नसलेल्या केवळ अंकिता पाटील या एकमेव जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यामुळे या पदावर त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. याला जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागानेही दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita Patil youngest member in the standing committee of ZP