अंकुश आतकर यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
PPN26B01165
अंकुश आतकर
अंकुश आतकर यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार
पिंपळनेर ः कलावंत दादासाहेब फाळके असोसिएशन पुणे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद व स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट व कलाक्षेत्रातील कलाकारांना दिला जाणारा यंदाचा कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार बारलोणी (ता. माढा) येथील अभिनेते अंकुश आतकर यांना नुकताच जाहीर झाला आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रात दोन दशकापासून अधिक काळ विविध चित्रपट, मालिका, वेबसिरीसच्या माध्यमातून विविध भूमिकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे व ग्रामीण भागात पका भाऊजी या नावाने ओळखले जाणारे श्री. आतकर यांना विविध संस्थांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पुणे येथील प्र.के.अत्रे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळयानिमित्त दादासाहेब फाळके असोसिएशन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद व स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. १९फेब्रुवारी) आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अनिल नगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीश राजूरकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

