कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अंकुश आतकर सन्मानित

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अंकुश आतकर सन्मानित

Published on

PPN26B01167
पुणे ः कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना अंकुश आतकर.

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने आतकर सन्मानित

पिंपळनेर, ता. २२ ः आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन व कलावंत दादासाहेब फाळके असोसिएशन पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर (बारलोणी, ता.माढा) यांना पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिरात (संत तुकारामनगर) कलावंत दादासाहेब फाळके असोसिएशन, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने (ता.१९) शिवजन्मोत्सवानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील १७० कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस कमिशनर सुनील हिरूरकर, वायुसेना फोर्सचे तांत्रिक अधिकारी सुरेश पोखरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, काजल शिंदे मधु कुलकर्णी, अभिनेते काळूराम ढोबळे, निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, उमेश बांदल,भाग्यदेव घुले, प्रशांत तपस्वी, देव झुंबरे,जगदीश सांधनशिव स्टार माझाचे राहुल शिंदे आदी चित्रपट व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे प्रमुख गिरीश सुदाम राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश गजबे, सिद्धार्थ शिंदे यांचे नियोजन, शिस्तबद्धता व कलाकारांना दिलेल्या सन्मानामुळे या कार्यक्रमाला विशेषण उंची प्राप्त झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com