जाधववाडीत विविध मान्यवरांचा सन्मान

जाधववाडीत विविध मान्यवरांचा सन्मान

Published on

मंचर, ता. ३ : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे विश्वासू सहकारी (स्व.) सुखाशेठ जाधव फुलवाले यांनी आंबेगाव तालुक्यातील अनेकांना मुंबईत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. गोरगरिबांच्या मदतीसाठी आयुष्यभर झटलेल्या या कार्यकर्त्याच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे विविध मान्यवरांचा गौरव सोहळा पार पडला.
पराग मिल्क फुड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांना ‘आंबेगाव भूषण’, पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांना ‘संगमनेर भूषण’, ज्येष्ठ पत्रकार विशाल परदेशी यांना ‘आदर्श पत्रकार’, उद्योजक अभय कोठारी यांना ‘युवा उद्योजक’, पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश परदेशी व भोरचे उपअभियंता राजेसाहेब आगळे यांना ‘आदर्श अभियंता’, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता विलास कांबळे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा विशेष जीवनगौरव पुरस्कार विलास कांबळे यांनी स्वीकारला.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाधव कुटुंबीयांनी गावात प्रवेशद्वार, रुग्णवाहिका व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यक्रमापूर्वी (स्व.) जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड, शैलजा ढोबळे, अरुण गिरे, देविदास दरेकर, डॉ. सुहास कलशेट्टी, डॉ. सुहास कांबळे, डॉ. मोहन साळी उपस्थित होते.
लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ जाधव, उपसरपंच संपतराव जाधव, नरसिंह पतसंस्थेचे माजी अध्यक्ष संतोष वाघ, किसनराव जाधव, चेतन जाधव, विशाल जाधव, बाबाजी जाधव व आंबेगाव तालुका पत्रकार संघाने व्यवस्था पाहिली. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. रमेश जाधव यांनी आभार मानले.

आयोजक पत्रकार रमेश जाधव यांनी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, अंकुर वाढवे, नम्रता सुमिराज व गायिका राधा खुडे यांच्या सादरीकरणाने ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. जाधव कुटुंबाचे कामकाज समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे. गेली वीस वर्ष सतत हा उपक्रम त्यांनी सुरू ठेवला आहे.
- देवेंद्र शहा, अध्यक्ष, पराग मिल्क फुड्स, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com