श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी : माजी आमदार जयवंतराव जगताप
KOR26B10626
करमाळा ः येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात येणारे अन्नपूर्णा योजनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप व उपस्थित मान्यवर.
श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी : माजी आमदार जयवंतराव जगताप
अन्नपूर्णा योजनेच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम;
करमाळा, ता. २२ : करमाळा शहरातील निराधार व्यक्तींना जेवणाची व्यवस्था करण्याचे काम ९ वर्षांपासून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून श्रीराम प्रतिष्ठान करत आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले.
येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त २०१८ साली सुरू करण्यात आलेल्या निराधारांसाठीच्या अन्नदान उपक्रमाचा नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रमुख गणेश चिवटे यांनी उपस्थित आमचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी हभप नाना महाराज पांडेकर व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, दिलीप ढेरे, पंचायत समिती सदस्य भरत आवताडे, मानसिंग खंडागळे, श्रेणिक खाटेर उपस्थित होते.
जगताप म्हणाले, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे नऊ वर्षांपासून सातत्याने निराधारांना अन्नदान करत आहेत. केवळ अन्नदानच नव्हे, तर त्यांनी निराधारांचे मातृत्व स्वीकारत त्यांना आपलेपणाची ऊब दिली आहे. ही सेवा केवळ उपक्रम नाही; ती एक साधना आहे. ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने करुणा आणि प्रामाणिकपणा असतो, त्यांच्याच हातून असे कार्य घडते, असे ते म्हणाले.
यावेळी ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सेवा, दया आणि परोपकार हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन केले. निराधार, गरजू आणि वंचित घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड .भगवान गिरी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

