

Nostalgia in Junnar: 1994 Batch Alumni Reunion at Annasaheb Awate Vidyamandir
Sakal
जुन्नर : जुन्नर येथे श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था शिवनेर जुन्नर संचलित अण्णासाहेब आवटे विद्यामंदिराच्या सन 1994 सालच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाळेमध्ये आपल्या वर्गातील बाकांवर बसून माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. याप्रसंगी शालेय जीवनातील आठवणी जागृत झाल्याने माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले तर उपस्थित विद्यार्थी भाविक झाले.