esakal | अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

magar college

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल ------------------------

हडपसर : ज्ञानज्योत रॅली, रक्तदान शिबीर, कोरोना प्रबोधन पथनाट्य, चर्चासत्र आदी उपक्रमांनी येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानदसचिव संदीप कदम, आमदार चेतन तुपे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी व विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, संस्थेचे खजिनदार मोहनराव देशमुख, सहसचिव ए. एम. जाधव, उपसचिव एल.एम.पवार, माजी प्राचार्य महादेव वाल्हेर आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

दिग्दर्शक मंजुळे म्हणाले, "ज्ञान आणि भाषा यांबाबत समाजात असलेल्या गोंधळामुळे मराठीला कमी लेखले जात आहे. मात्र, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मगर महाविद्यालयाने ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासात जे काम केले आहे, ते पाहिल्यावर हा गोंधळ कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आज महाविद्यालयाचे अनेक गरीब विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यादृष्टीने हा सुवर्ण महोत्सव महत्वपूर्ण आहे.'

प्राचार्य डॉ. पंडित शेळके म्हणाले, "हडपसर हे शहरातील वेगाने विकसित झालेले उपनगर असून या परिसराच्या सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात मगर महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. १९७१ ला अण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने व अनेक दानशूर व्यक्तींच्या देणग्यांतून सुरू झालेले हे महाविद्यालय आज आजी माजी विद्यार्थ्यांच्या कर्तबगारीने नावारूपाला आले आहे.

विविध विषयांच्या पीएच.डी . संशोधन केंद्रासह अद्ययावत उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे.' उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. अनंत माने, अनिल जगताप, काकासाहेब थोरात, प्रभारी अधिक्षक धनंजय बागडे, प्रा. नितीन लगड यांनी संयोजन केले.

loading image
go to top