
पुणे - महापालिका (Municipal) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये स्वखर्चाने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर (Water Tanker) पुरविणार अशी घोषणा केल्यानंतर काही दिवसातच नगरसेवकाने (Corporator) या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी (Water Supply) ९० लाख रुपये उपलब्ध व्हावेत यासाठी आयत्यावेळी प्रस्ताव (Proposal) ठेवला. मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य न करता एक महिना पुढे ढकलला आहे. (Announcement of Free Tankers and Proposal for Permanent Front Classification)
स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर बालेवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रीय महामार्ग लगत सुशोभीकरण करण्यासाठी ९० लाख रुपयांच्या वर्गीकरणाचे तीन प्रस्ताव दिले होते. मंगळवारी स्थायीची बैठक सुरू होताच नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हे विषय मागे घेऊन ऐनवेळी सुस व महाळुंगे या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी हा ९० लाखाचा निधी वर्गीकरण करावा असा प्रस्ताव दिला. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत हे वर्गीकरणाचे प्रस्ताव लगेच मान्य न करता एक महिना पुढे ढकलले. याबाबत अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पिण्याचे पाणी देण्याचे जबाबदारी महापालिकेची आहे पण टँकरने पाणी पुरवठा करण्याचे वर्गीकरणाचे विषय केला नाही. हा प्रस्ताव एक महिना पुढे ढकलला आहे.
अमोल बालवडकर म्हणाले, ‘२२ जुलै पासून मी स्वखर्चाने रोज २० टँकर या दोन्ही गावात देत आहे, पण गावांमधून मागणी वाढली असल्याने त्यासाठीचा खर्च करण्यासाठी ९० लाखाचे वर्गीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.