दहिवडीत बक्षीस वितरण, स्नेहसंमेलन उत्साहात
दहिवडीत बक्षीस वितरण, स्नेहसंमेलन उत्साहात
दहिवडी, ता. १० : येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे व सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज करिअर ॲकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर, महिमानगड फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गोडसे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर प्रा. अनिल दडस, माजी मुख्याध्यापिका रेखा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील २१० विद्यार्थिनींना चषक, शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कला महोत्सवात नृत्य, गीत गायन, नाटिका आदी एकूण ३६ कलाविष्कारांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. यात विद्यालयातील १४२ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींच्या कलागुणांना उपस्थित मान्यवर व पालकांनी भरभरून दाद दिली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता काटकर यांनी प्रास्ताविक केले. राणी आसबे व अर्चना खैरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील वसव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक औदुंबर हंबीरे, उपशिक्षिका रंजना पोळ व हेमलता बंडगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------
07358
दहिवडी : प. म. शिंदे कन्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींसोबत उपस्थित सुनील काटकर, गणेश गोडसे, अनिल दडस, रेखा पवार आदी मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

