
पुणे : भारतीय संरक्षण दलातील माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना (ईसीएचएस) संघटनेकडून अवलंबित सदस्यांसाठी वार्षिक पात्रता पडताळणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित अवलंबितांचे ईसीएचएस कार्ड तात्पुरते निलंबित केले जाणार आहे. याबाबतची सूचना नुकतीच ईसीएचएस विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.