बारामतीतील 'त्या' 17 जणांची कोरोना टेस्ट...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

- बारामती पॅटर्नच्या मदतीने बारामतीकरांनी सामूहिक प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्यात यश प्राप्त.

बारामती : तालुक्यातील माळेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सर्व 12 जणांचे अहवाल तसेच बारामतीतून पाठविलेल्या पाच जणांचे असे 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती पॅटर्नच्या मदतीने बारामतीकरांनी सामूहिक प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्यात यश प्राप्त केलेले असल्याने आता बारामतीच्या व्यापारपेठेला अधिक गतिमान करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. छोट्या व्यावसायिकांनाही आता दिलासा दिला जावा आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लावण्याच्या दृष्टीने निर्णय व्हावा, अशी मागणी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत महावितरणचा वायरमन असलेला कोरोनाबाधित आढळला असला तरी तो पुण्याहून बारामतीला आलेला होता. त्यामुळे बारामतीत त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नसल्याचे प्रशासनानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे माळेगाव गावापुरतेच प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले होते. आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लॉकडाऊनमध्ये गेलेला आहे. 
सोमवारपासून बारामतीच्या बाजारपेठेतील दुकानांना आठवड्यातून दोन दिवस दुकाने उघडण्याची परवानगी दिलेली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नसल्याने व बारामतीकरांनी शिस्तीचे पालन केलेले असल्याने आता अधिक शिथिलतेची मागणी होत आहे. येत्या सोमवारपासून दोनऐवजी किमान चार दिवस दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. शिस्तीचे पालन करुन व्यवहार सुरळीत करणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 17 Peoples Corona Test Negative in Baramati