जिल्ह्याला हवेत कोरोनाचे आणखी ९० लाख डोस

सव्वीस लाख नागरिकांचा पहिला, ३८ लाखांचा दुसरा डोस बाकी
pune
punesakal

पुणे: पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ लाख ९९ हजार ४२६ नागरिकांनी कोरोनाचा अद्यापही एकही डोस घेतलेला नाही. शिवाय आणखी ३७ लाख ३८ हजार ३९४ नागरिकांना दुसरा डोस मिळणे बाकी आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याला आणखी किमान ८९ लाख ३७ हजार २३६ डोसची गरज आहे.

पुणे जिल्ह्यात अठरा वर्षे वयापुढील एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ नागरिक आहेत. हे सर्व जण कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत ५९ लाख ४० हजार २८० जणांनी कोरोना लसीकरणात पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी २२ लाख १ हजार ८८६ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण ८१ लाख ४२ हजार १६६ डोस घेतले आहेत.

आतापर्यंत झालेल्या लसीकरणात एकूण पात्र नागरिकांपैकी ७० नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. सध्या ३० टक्के नागरिक हे पहिल्या डोसपासून दूर राहिले आहेत. पहिला डोस घेतलेल्यांपैकी फक्त ३८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आणखी २२ टक्के नागरिक हे दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कोरोना स्थितीच्या आकडेवारीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. त्या सादीरकरणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

कोरोना लसीकरण १६ जानेवारी २०२१ पासून सुरु झाले आहे. मागील आठ महिन्यांपासून सातत्याने हे लसीकरण सुरु आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक, ६० वर्षे वयापुढील सर्व, ४५ वर्षे वयापुढील सहव्याधी असलेले आणि नसलेले आणि त्यानंतर किमान अठरा वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे.

क्षेत्रनिहाय झालेले लसीकरण (दोन्ही डोस मिळून)

  1. पुणे शहर --- ३४ लाख ९० हजार ६२४

  2. पिंपरी चिंचवड --- १५ लाख ४७ हजार ५९०

  3. पुणे ग्रामीण --- ३१ लाख ०३ हजार ९५२

...................................................

- पुणे जिल्हा एकूण --- ८१ लाख ४२ हजार १६६

महिनानिहाय झालेले एकूण लसीकरण

  1. - जानेवारी २०२१ --- २५ हजार १४४

  2. - फेब्रुवारी --- १ लाख १८ हजार ८०२

  3. - मार्च --- ७ लाख ४० हजार ६७५

  4. - एप्रिल --- १४ लाख ८३ हजार २९७

  5. - मे २०२१ --- ५ लाख ४३ हजार ४७३

  6. - जून --- १५ लाख २८ हजार ९६६

  7. - जूलै --- १७ लाख ८१ हजार ५६१

  8. - आॅगस्ट --- १८ लाख ८० हजार ०२९

  9. - सप्टेंबर ( ३ तारखेपर्यंत) --- ४० हजार २१९

....................................................

- एकूण --- ८१ लाख ४२ हजार १६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com