पुणे - बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे..डॉ. तुकाराम मोटे (वय-५२) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोटे याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी फिर्याद दिली आहे. नऊ जानेवारी २०२५ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान उरुळी कांचन येथील माहेर रुग्णालयात ही घटना घडली आहे..फिर्यादी यांनी पथकासह केडगाव येथील लवंगारे रुग्णालयात बेकायदा गर्भपात प्रकरणी तपासणी केली असता, रुग्णालयातील रजिस्टरमधील माहितीवरून एका महिला रुग्णाशी संपर्क साधला असता ती डॉ. मोटे यांच्या माहेर रुग्णालयात दाखल होती. रुग्णालयात रुग्णांची संमती न घेता काही गर्भपात केल्याचे दिसून आले, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे..सरकारी नियमांचे पालन न करता तसेच कागदपत्रांची पूर्तता न करता रुग्णांची संमती न घेता गर्भपात केला असल्याने त्याचा सखोल तपास करायचा आहे. रुग्णांचे केसपेपर व कागदपत्रे तयार करताना रुग्णांची पूर्ण माहिती न टाकता कागदपत्रे अपूर्ण स्वरूपात बनवली असून, त्याबाबत तपास करून रुग्णांची माहिती निष्पन्न करून त्यांच्याकडे तपास करण्यासाठी व त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, गर्भपाताचे रॅकेट आहे का?, जप्त करण्यात आलेल्या रजिस्टर व्यतिरिक्त आणखी रजिस्टर आहे का?, यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील भाग्यश्री संचेती-डागळे यांनी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.