
पुणे : लोकांच्या मनात कायद्याची भीती नाही. कोणत्याही रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. तसेच आता ‘हेल्मेट’ किंवा ‘चिलखत’ घालूनच चालावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेजबाबदार वाहनचालकांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. याला पोलिस व महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पुणेकरांनी व्यक्त केले.