esakal | पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

Another policeman dies in Pune due to corona

कोरोनामुळे मृत्यु झालेले पोलिस कर्मचाऱ्यास काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. मृत्यु झालेले पोलिस कर्मचारी हे शहराच्या पूर्व भागातील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. 

पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर पोलिस दलातील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा गुरुवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यु झाला. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्यात कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यु झाला आहे. तर शहरातील 21 पोलिसांना कोरोना झाला होता, त्यापैकी 10 जणांना घरी सोडण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे मृत्यु झालेले पोलिस कर्मचाऱ्यास काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. मृत्यु झालेले पोलिस कर्मचारी हे शहराच्या पूर्व भागातील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आत्तापर्यंत 20 ते 21 पोलिसांना कोरोना झाला होता, त्यापैकी 10 जण बरे झाल्याने त्यांना मागील आठवड्यात घरी सोडण्यात आले होते.तर उर्वरित पोलिसांवर उपचार सुरु होते. दरम्यान, वाहतूक शाखेतील पोलिसावरही उपचार सुरु होते. तर मागील आठवडयात मध्यवर्ती भागातील एका पोलिसाचा मृत्यु झाला होता. तर  गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला.

कोरोनाच्या लढाईत घटले आयुक्त शेखर गायकवाड यांचे वजन

loading image