उत्तरपत्रिका तपासणी मानधन ‘सीबीएसई’ पॅटर्नप्रमाणे द्यावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी कमी मानधन मिळत आहे. दहावीच्या प्रत्येक उत्तरपत्रिकेला पाच, तर बारावीसाठी सहा रुपये मिळतात. ‘सीबीएसई’प्रमाणे प्रति उत्तरपत्रिका १० ते १२ रुपये मानधन मिळावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी कमी मानधन मिळत आहे. दहावीच्या प्रत्येक उत्तरपत्रिकेला पाच, तर बारावीसाठी सहा रुपये मिळतात. ‘सीबीएसई’प्रमाणे प्रति उत्तरपत्रिका १० ते १२ रुपये मानधन मिळावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावी व दहावीची परीक्षा घेतली जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडून सुमारे तीनशे ते सव्वातीनशे रुपये शुल्क आकारले जाते. परीक्षा झाल्यानंतर त्वरित उत्तरपत्रिका तपासून वेळेमध्ये निकाल लावण्याची जबाबदारी मंडळावर असते. यासाठी मंडळांकडून शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी दिली जाते. उत्तरपत्रिका तपासण्याचे मानधन हे अतिशय कमी आहे. उत्तरपत्रिका तपासणे हे महत्त्वाचे काम आहे. मात्र, मंडळाकडून सन्मानजनक मानधन मिळत नाही. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे शिक्षकांनी केली आहे.

उत्तरपत्रिका तपासण्याचे काम महत्त्वाचे आहे. पण राज्य परीक्षा मंडळाकडून नाममात्र मानधन दिले जात आहे. यात २०१७ मध्ये मानधनात वाढ केली होती. पण ती अतिशय कमी आहे. सीबीएसईप्रमाणे १० ते १२ रुपये मानधन दिले पाहिजे.
- प्रकाश पवार, शिक्षक हितकारणी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Answer sheet checking fees should be given in the same way as CBSE pattern