
कर्वेनगर: शिवणे परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानासमोरील फ्रंट मार्जिनवर, तसेच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पुणे महापालिकेने धडक कारवाई केली. या कारवाईत दुकानदारांनी व्यापलेली समोरील जागा रिकामी करण्यात आली असून, रस्त्याच्या शिस्तबद्ध वापरासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.