Mahesh nampurkar and Shrimant Malojirae Bhosale Tisare
Mahesh nampurkar and Shrimant Malojirae Bhosale Tisaresakal

Pune News : अक्कलकोटमध्ये साकारणार भव्य ‘अनुभूती’ प्रकल्प

श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोटमध्ये श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टतर्फे ४२ एकरांच्या जागेवर ‘अनुभूती’ प्रकल्प साकारण्यात येत आहे.

पुणे - श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोटमध्ये श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टतर्फे ४२ एकरांच्या जागेवर ‘अनुभूती’ प्रकल्प साकारण्यात येत आहे. श्री अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांच्या संकल्पनेतून हा भव्य प्रकल्प आकारास येत आहे.

‘अनुभूती’ ही आध्यात्मिक संकल्पना असून, या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थ यांची पंचधातूमध्ये तयार केलेली १०८ फूट उंच भव्य मूर्ती (स्ट्यॅच्यू ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार आहे. त्यासह दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी ‘कुंजरबन’ आदींचा समावेश प्रकल्पात आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि प्रकल्पाचे प्रमुख वास्तुविशारद महेश नामपूरकर यांनी सोमवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी अक्कलकोट संस्थानची ४२ एकर जागा दिली आहे. यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून, आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.

...असा असेल प्रकल्प

  • स्वामी समर्थ यांची १०८ फूट उंच पंचधातूतील मूर्ती

  • भाविकांसाठी ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र

  • ४०० खाटांचे बहुउद्देशीय रुग्णालय आणि सुसज्ज पार्किंग

  • शाही हत्तींचे निवासस्थान असलेले खास ‘कुंजर बन’

  • कुटुंबासाठी छोटेखानी निवासव्यवस्था असलेले स्टुडिओ अपार्टमेंट

  • स्वामी समर्थ यांचे जीवन चरित्र अनुभवण्यासाठी ‘दिव्य दर्शन’ येथे दिव्य गुंफा

  • १८ वैशिष्ट्यपूर्ण बंगल्यांचे रिसॉर्ट

  • २० उपहारगृहांचे फूड कोर्ट

चार वर्षांपूर्वी अक्कलकोट येथे दरदिवशी सरासरी दहा हजार भाविक येत असत. चार वर्षांतच ही संख्या आता ३५ हजारांवर गेली आहे. ‘अनुभूती’ प्रकल्पामुळे अक्कलकोट गावाला आणि आसपासच्या परिसराला लाभ होईल. या प्रकल्पात स्वामीभक्तांना असीम शांतता आणि आध्यात्मिक आनंद अनुभवता येईल.

- श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com