उंडाळे. क्रिडा पानासाठी. अनुष्का करांडे लांब उडी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.

उंडाळे. क्रिडा पानासाठी. अनुष्का करांडे लांब उडी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.

Published on

लांब उडी स्पर्धेत
अनुष्का कारंडे द्वितीय

उंडाळे, ता. ४ : डेरवण (रत्नागिरी) येथे झालेल्या मैदानी स्पर्धेतील लांब उडी खेळ प्रकारात सोळा वर्षांखालील गटामध्ये तुळसण (ता. कऱ्हाड) येथील श्री निनाईदेवी विद्यालयातील इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी अनुष्का आनंदा करांडे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, स्पोर्टस्‌ ॲकॅडमी कासारवाडी सावर्डे यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या.
अनुष्काला क्रीडा शिक्षक आनंदराव जानुगडे, श्री दत्ता पाटील, प्रतीक कदम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव माने, सेवाभावी सामाजिक संस्थेचे सचिव उत्तमराव वीर, दिलीपराव पाटील, तुळसण विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी येथील ग्रामस्थ यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.

फोटो ओळी
00836
डेरवण : अनुष्का कारंडे हिची सत्कार करताना मान्यवर.

Marathi News Esakal
www.esakal.com