

Eight-Year-Old Anvi Hinge Creates History in Bangkok Asian Youth Chess Championship 2025
Sakal
पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील आठ वर्षांची बुद्धीबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने बँकॉक (थायलंड) येथे दि. २० ते दि. ३० नोव्हेंबर दरम्यान झालेल्या आशियन युथ चेस चॅम्पियनशिप २०२५ मध्ये गर्ल्स अंडर– ८ गटात भारतासाठी सलग तीन सुवर्णपदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत ३३ देशांमधील तब्बल ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आशियातील सर्वात प्रतिष्ठित व आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये अन्वीने अपूर्व सातत्य, अचूकता आणि दमदार खेळ दाखवत भारतीय संघाचे नेतृत्व केले.