'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्घाटन अन् आज तोडफोड

'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्घाटन अन् आज तोडफोड

किरकटवाडी: पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या व कालच दि.14 जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Apala Khadakwasla selfie point vandalized by unknown people)

खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. कालच सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. आकर्षक विद्युत रोषणाई व धरणाच्या पाण्यात दिसणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब यामुळे रस्त्यावरुन येणारा-जाणारांना या ठिकाणी थांबण्याचा मोह आवरत नव्हता.

'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्घाटन अन् आज तोडफोड
रिकामी रिक्षा फिरवून, लेकरांचे पोटही रिकामेच!

आज सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता त्यांना या सेल्फी पॉईंटची तोडफोड झालेली दिसली. दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंच यांचा नामफलक तोडण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच सरपंच सौरभ मते व इतर पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीची पाहणी केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हवेली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सौरभ मते यांनी सांगितले.

'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्घाटन अन् आज तोडफोड
पुण्यात शनिवारी या भागात वीज पुरवठा होणार खंडीत

"अत्यंत निंदनीय कृत्य आहे. खडकवासला गावच्या अस्मितेवर झालेला हा हल्ला सहन केला जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून हे दूशकृत्य करणारे शोधून काढावेत अशी विनंती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना केली आहे."

-विजय मते, मनसे, खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष.

"आदरणीय खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून वेळ काढून या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले.त्यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले,परंतु समाजकंटकांनी रात्रीत या वास्तूची तोडफोड केली. ग्रामस्थांच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध. पोलीसांना याबाबत सखोल तपास करण्याची विनंती करणार आहे."

- सौरभ मते, सरपंच खडकवासला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com