नागठाणे ''नासा''ची सफर

नागठाणे ''नासा''ची सफर
Published on

अपशिंगेतील विद्यार्थी अनुभवणार ‘नासा’ची सफर

ऐतिहासिक क्षण; अंतराळ विज्ञानाशी विद्यार्थ्यांना जोडण्याची संधी

सुनील शेडगे ः सकाळ वृत्तसेवा
नागठाणे, ता. ११ : सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर झळकणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पासेस ‘नासा’कडून मिळाले आहेत. शाळेसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या आर्टेमिस-२ या मोहिमेत जगभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात अपशिंगेतील शाळेनेही नोंदणी केली होती. उपक्रमशील शिक्षिका शुभांगी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थी, पालक अन् शिक्षक सहभागी झाले. त्यांना ‘नासा’तर्फे अधिकृत बोर्डिंग पास मिळाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख रमेश मगर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर मोरे तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे. याकामी मुख्याध्यापिका मंगल जगताप यांच्यासह अनिता पवार, संगीता यादव, लता देवकर, प्रदीप पवार, अजित लोहार, अलका दुधगावकर, वैभव चिखले, विद्या घाडगे, विजय घाडगे, संगीता कणसे, पौर्णिमा ढाणे, सचिन थोरवे, संध्या कोकणे, भाग्यश्री जाधव या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

चौकट

अमेरिकेतून होणार प्रक्षेपित
‘नासा’ची ही मोहीम एप्रिल महिन्यापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथून प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच तसेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन हे ‘एसएलएस’ (स्पेस लॉन्च सिस्टम) रॉकेट अन् ओरियन अंतराळयानातून अवकाशात झेप घेणार आहेत.

चौकट

दीर्घकाळाने मोठी मोहीम
तब्बल ५४ वर्षांनंतर मानवाची चंद्राभोवतीची ही मोठी मोहीम मानली जात आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून ती प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे सहा लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य लोकांना व्हावी, या दृष्टीने नासाने हा उपक्रम आयोजिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com