
मार्केट यार्ड : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचालींना सध्या गती मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतच्या पणन सुधारणा विधेयकास मान्यता दिली आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. या निर्णयामुळे पारंपरिक व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळणार असून, स्थानिक व्यापाराच्या मर्यादा ओलांडून राष्ट्रीय व्यापारी जाळे निर्माण होणार असल्याची भावना व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.