

Pune Municipal Corporation
पुणे - बालगंधर्व रंगमंदिरात एकाच वेळी दोन कार्यक्रमांची वेळ आरक्षीत झाल्याने त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवून पुन्हा असे प्रकार घडू देऊ नका असे सुनावले. बालगंधर्व रंगमंदिरासह अन्य महत्वाच्या नाट्यगृहांचे ठराविक लोकांकडे महत्वाच्या दिवसांचे आरक्षण कसे काय जाते ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हे प्रकार टाळण्यासाठी रंगयात्रा ॲपद्वारे ऑनलाइन आरक्षण सुरु करा, दबावाला बळी पडू नका असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत.