भूगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुर्तीदान करण्याचे आवाहन

id.jpg
id.jpg
Updated on

कोळवण : कोविडमुळे यंदा नदी, तलावातील विसर्जनावर अनेक गावे, महापालिकेने बंदी आणली आहे. शहरातही नैसर्गिक विसर्जन स्थळांवर पालिकेने मुर्ती संकलन केंद्र सुरु केले आहे. यांत भूगाव ग्रामपंचायताने एक पाऊल पुढे टाकत पर्यावरणाची हानी होवू नये यासाठी गणेशमुर्ती संकलन करुन ''मुर्तीदान जलसृष्टीला जीवनदान'' या ब्रीदवाक्यानुसार गणेश मुर्तीचे दान करीत आहे.

भूगाव येथील तलावातील पाणी गावकरी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरत असल्याने ग्रामपंचायतीतर्फे तलावातील विसर्जन बंद करून हौद बांधण्यात आला आहे. हौदात विसर्जन झाल्यावर त्या गणेशमुर्ती त्वरीत काढुन, गाडीमध्ये व्यवस्थित ठेऊन म्हाळुंगे येथे हलविण्यात येत आहेत. तसेच ज्यांना मुर्ती विसर्जन न करता दान करायची आहे त्यांनी त्यांनी भूगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ मुर्ती जमा करावी. म्हाळुंगे येथील श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाडाळे या स्वयंसेवकाने मुर्ती दान करुन आलेले पैसे समाजोपयोगी कार्यासाठी वापरले आहेत. 

भूगाव येथील तलावावर कोथरुड, भुगाव, भुकुम, बावधन येथील अनेक गणेशभक्त विसर्जनासाठी येतात. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमते. परंतु यंदा गर्दी होऊ नये यासाठीही काळजी ग्रामपंचायत घेत आहे. तलावातील पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत असल्याने प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीकोणातुन हे पाउल उचलले असुन या उपक्रमाचे सर्वांकडुन कौतुक केले जात आहे.

“मागील वर्षी सुमारे पसतीस हजार गणेशमुर्त्या श्री फाउंडेशनकडे दान करण्यात आल्या, त्यातील सुस्थितीतील मुर्त्यांना रंग देउन अत्यंत कमी किमतीत विकण्यात आल्या. मजुर व अतिरिक्त खर्च वगळता आलेले पैशातुन  अनाथ, गरिब मुलांना वस्तुस्वरुपात मदत करण्यात आली. तसेच लाॅकडाऊन व निसर्ग वादळात हानी झालेल्या कुटुंबियांना अन्नधान्य तसेच जिवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आल्या. सुस्थितीत नसलेल्या मुर्त्या विरघळवून खाली राहिलेली पावडर ही आग विझवण्यासाठी, फकी अथवा त्याचे खडू बनवनार आहे.” अशी माहिती म्हाळुंगे येथील श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाडाळे यांनी दिली.

नैसर्गिक स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे.  मागील वर्षी ग्रामपंचातीच्या सहकार्याने दोन हजार गणेशमुर्तींचे स्वच्छेने दान करण्यात आल्या. यंदाही ज्यांना मुर्ती दान करायची आहे त्यांनी भूगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ जमा करावी तसेच ज्यांना कृत्रीम तलावात विसर्जन केलेली मुर्ती त्वरीत काढुन दान करण्यात येणार आहे. 
-निकिता सणस(सरपंच, भूगाव)

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com