Katraj News : काश्‍मीरचे सफरचंद-केशर पुण्यात मिळणार सवलतीच्या दरात

पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्‍मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांना पुण्याशी जोडण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे.
Sarhad Organization
Sarhad OrganizationSakal

कात्रज - पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्‍मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांना पुण्याशी जोडण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. तेथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सफरचंद आणि केशर सोपोर अॅपल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहाय्याने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले आहेत.

सफरचंद, आक्रोड, केशर आणि बदामसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्‍मीरच्या चिनाब खोऱ्यातील फळे कात्रज येथील सरहद संस्थेत आज (ता.१३) पासून सकाळी ११ ते ६ या वेळेत विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचा विक्री शुभारंभ सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया, महेश कदम, सुयोग झेंडे उपस्थित होते.

याठिकाणी सफरचंद १२५ रुपये प्रतिकिलो आणि केशर २५० रुपये प्रतिग्रॅमने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात अक्रोडही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ‘चिनाब खोरे म्हणजे दोडा, किश्‍तवाड, रामबन हा भाग येतो.

जम्मू काश्‍मीरमधील या भागात सध्या दहशतवाद व अस्थिरता पसरविण्याचा शत्रूचा प्रयत्न असून अनेक वर्षे उपेक्षित असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागातील शेतकऱ्यांचा पुणेकरांशी नाते जोडण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सोपोर अॅपल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक रामदास खोपडे आणि संतोष बालवडकर यांनी दिली.

प्रतिक्रिया

प्रत्येकवेळी जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. यावर दिर्घकालीन उपाययोजना करावी, या हेतूने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्याबरोबरच तेथिल शेतकऱ्यांना विविध मार्गांनी मदत करण्याच्या हेतूने हा प्रकल्प राबविला जात आहे. ही फळे थेट शेतातून आलेली असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांना मदत करावी.

- संजय नहार, संस्थापक, सरहद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com