

हेड
टर्नस यांच्याकडे
सीईओपदाची धुरा
सबहेड
कुक ॲपलचे कार्यकारी अध्यक्ष
न्यूयॉर्क, ता.२ (वृत्तसंस्था) ः ‘ॲपल’ कंपनीच्या नेतृत्वामध्ये मोठा बदल झाला आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून टीम कुक हे पायउतार झाल्यानंतर या पदाची धुरा जॉन टर्नस यांच्याकडे सोपविण्यात आली. ‘अमेरिकी सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’कडे दाखल केलेल्या वित्तीय दस्तावेजांमध्ये ‘ॲपल’ने टर्नस यांना दिल्या जाणाऱ्या वेतनाबाबत खुलासा केला आहे. टीम कुक यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टर्नस यांना वार्षिक ५५१ कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार असून टिम कुक यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून साधारणपणे ४४६ कोटी रुपयांची भरपाई मिळू शकेल.
- टर्नस यांना शेअरच्या रूपाने देखील आर्थिक मोबदला मिळत राहील. भांडवली बाजारातील किमतीमध्ये होणाऱ्या चढउताराबरोबर त्यामध्ये देखील बदल होतील.
-''ॲपल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने टर्नस यांना नेमके किती वेतन मिळत असे, याचा खुलासा होऊ शकलेला नाही, त्यांचे वार्षिक पॅकेज हे २३७ कोटी रुपये एवढे असावे, असे सूत्रांनी सांगितले.
.......
पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर
टर्नस हे पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी २००१ मध्ये ‘ॲपल’ कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. कामाच्या बळावर ते हार्डवेअर अभियांत्रिकी विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचले.
- आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल वॉच आणि एअरपॉड यासारख्या उत्पादनांच्या निर्मितीमध्ये टर्नस यांच्या टीमने तयार केलेले हार्डवेअर होते.
- आता टर्नस यांच्यासमोर पुढील पिढीतील अत्याधुनिक उपकरणे तयार करण्याचे मोठे आव्हान असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आगमनामुळे ते आणखी बिकट झाले आहे.
वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीयता
टर्नस यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना फारशी माहिती नाही, याबाबत त्यांनी कमालीची गोपनीयता बाळगल्याचे दिसून येते. अगदी त्यांचा विवाह झाला आहे की नाही हे देखील कुणालाच ठावूक नाही.
कर्मचाऱ्यांचे मानले आभार
जॉन टर्नस यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिले असून त्यात त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. टीम कुक यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतानाच त्यांनी कंपनीच्या दृष्टीने सभ्यपणा, शिष्टाचार आणि माणुसकी या मूल्यांना खूप महत्त्व असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.