esakal | Vidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात पंधरा जणांचे अर्ज मंजूर तर, एक नामंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Application of fifteen people approved and one disapproved in the Parvati constituency for Maharashtra Vidhan sabha 2019

पुणे : ​पर्वती विधानसभा मतदारसंघातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज नामंजूर झाल्याने सध्या पंधरा उमेदवार रिंगणात आहे. 
पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या दीपक घुबे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने नामंजूर करण्यात आला. घुबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Vidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात पंधरा जणांचे अर्ज मंजूर तर, एक नामंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ​पर्वती विधानसभा मतदारसंघातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज नामंजूर झाल्याने सध्या पंधरा उमेदवार रिंगणात आहे. 
पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या दीपक घुबे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने नामंजूर करण्यात आला. घुबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

माधुरी मिसाळ यांचा अर्ज मंजूर झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी करीत दाखल केलेला अपक्ष अर्ज मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही मंजूर झाला आहे. आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विनी कदम असणार आहे. आपकडून संदीप सोनवणे, बहुजन समाज पक्षाकडून रवींद्र
क्षीरसागर, बहुजन मुक्ती पार्टीचे शतायु भागले, वंचित बहुजन आघाडीचे ऋषिकेश नांगरे-पाटील यांचे अर्ज मंजूर झाले आहेत.

आबा बागुल, परमेश्‍वर जाधव, अरविंद करमरकर, रोहित नारायणपेठ, नितीन कदम, जयदेव इसवे, राहुल खुडे, निखिल शिंदे, सुरेश चौधरी, दीपक घुबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.