पुण्यात 'हे' ९ अधिकारी भेदणार कोरोनाचे चक्र

राजकुमार  थोरात
Saturday, 29 August 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हामध्ये नव्याने ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती

वालचंदनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गची साखळी तोडून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त सौरभ राव व महसूलचे उपआयुक्त प्रताप जाधव यांनी नव्याने ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून १८ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वाढत चालले रुग्ण चितेंचा विषय होत असून पुणे हॉटस्पॉट झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये ९ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यामध्ये प्रांतधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, एका अधिकाऱ्याकडे एका पेक्षा जास्त तालुक्याचा भार असल्याने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने जिल्ह्यासाठी नव्याने ९ अधिकारी दिले असून यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांचा ही समावेश असून हे सर्व अधिकारी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकाऱ्याचे नाव व कार्यक्षेत्र
हिंमत खराडे - इंदापूर 
दादासाहेब कांबळे - बारामती 
प्रमोद गायकवाड - पुरंदर
भानुदास गायवाड - दौंड
राजेंद्रकुमार जाधव- भोर 
श्रीमंत पाटोळे - वेल्हा
संदेश शिर्के - मावळ
सुनिल गाढे- मुळशी
संतोषकुमार देशमुख- शिरुर
संजय तेली - खेड
अजय पवार- जुन्नर
सारंग कोडोलकर- आंबेगाव 
सचिन बारवकर- हवेली
सुनिल कोळी- हवेली तालुक्यातील थेऊर व उरुळीकांचन मंडल
आप्पासाहेब समिंदर -   हवेली तालुक्यातीलवाघोली व कळस मंडल
निलप्रसाद चव्हाण-  हवेली तालुक्यातील खेड शिवापूर व हडपसर मंडल
बालाजी सोमवंशी-  हवेली तालुक्यातील कोथरुड व खडकवासला मंडल
गिता गायकवाड- पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of 9 new officers in the district to prevent corona infection