नियम धाब्यावर बसवून थकबाकीदारांची प्रशासकीय कमिटीवर नेमणूक

उपनिंबधक कार्यालयात अनागोंदी कारभार
Housing-Society-Election
Housing-Society-Electionsakal media

कॅन्टोन्मेंट - सहकारी नियम धाब्यावर बसवून थकबाकीदारांची प्रशासकीय कमिटीवर नेमणूक केल्याप्रकरणी महर्षी नगर येथील पुरंदर सहकारी गृह रचना संस्था मर्यादीत सोसायटीतील सभासदांनी उपनिंबधक कार्यालयात अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

जे सोसायटीचे सभासद नाही तसेच थकबाकीदार असूनही अश्यांचे सोसायटीच्या प्रशासकीय कमिटीच्या सदस्यपदी नियुक्तीचे आदेश उपनिबंधक दिग्विजयसिंह राठोड यांनी काढले आहेत. यावेळी राठोड यांच्या चौकशीची मागणी सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश भोसले, माजी सचिव किशोर शिंदे तसेच आदी सभासदांनी महा. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करताना केली आहे.

पुरंदर सहकारी गृह रचना संस्था मर्यादीत महर्षीनगर या सोसायटी विरुध्द उपनिबंधक पुणे-शहर(१ )येथे दि. २२ डिसें २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. उपनिबंधक यांनी तक्रारी विरोधात सोसायटीस कोविडचे कारण देऊन सुनावणीस उपस्थिती न राहण्याचे पोस्टाने कळविले. थकबाकी तक्रारदारांना कार्यालयात बोलवून कायदा धाब्यावर बसवून सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व कोषाध्यक्ष यांना पाच वर्षासाठी अपात्रतेचे आदेश ही पारित करण्यात आले.

याविरोधात सोसायटीने डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर को-ऑप्रेटिव्ह सोसायटी पुणे डिव्हिजन शिवाजीनगर येथे अपिल दाखल केले आहे. सोसायटीचा कार्यभार सांभाळण्यासाठी प्रशासक हे नियुक्तीवर असताना त्यांनी थकबाकी वसुलीची कार्यवाही सुरू केली. सोसायटी पदाधिकारी हे वसुलीची मागणी करतात म्हणून त्यांची ही नियुक्ती रद्द केली त्याचबरोबर प्रशासक यांचीही नियुक्ती रद्द केली. असा अनागोंदी कारभार उपनिंबधक कार्यालयात सुरू असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.

यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश भोसले म्हणाले की, थकबाकीदार यांना थकबाकी भरण्यास आग्रह धरला असता त्यांनी सोसायटी विरोधात बोगस सह्यांचा अर्ज दाखल केला आहे. सोसायटीचे म्हणने ऐकून न घेता सोसायटी विरोधात आदेश काढले. प्रशासकाने उपनिबंधक यांच्याकडे १३ डिसें २०२१ रोजी १०१ च्या कारवाई साठी प्रस्ताव ठेवला असून आठ महिने उलटून सुध्दा कारवाई केली जात नाही. सोसायटीने आयुक्तांकडे दोन वेळा अर्ज केला आहे. राठोड यांनी कायदाला न जुमानता आदेश काढल्याने त्यांनी मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा सभासदांना संशय आहे. याची चौकशी व्हावी. असे भोसले यांनी सांगितले.

यावेळी उपनिबंधक दिग्विजयसिंह राठोड यांनी त्यांची बदली झाल्याचे सांगून उपनिबंधक अरुण साकोरे यांच्याशी बोला असे सांगून अधिक बोलण्यास टाळाटाळ केली. यावेळी उपनिंबधक अरुण साकोरे म्हणाले की, हे प्रकरण माझ्या कालावधीत झालेले नाही. थकबाकीदारांची प्रशासकीय कमिटीवर तशी नेमणूक करता येत नाही. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे साकोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com